Gold Rate: सोनं-चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
Gold Price Today: गेल्या काही महिन्यात सोनं आणि चांदीचे दर 12 हजार रुपयांनी वाढले आहेत. आधीच सर्वसामान्य लोक महागाईचा झळा सोसत आहे. तर दुसरीकडे सोन्याचे वाढते दर थांबवयचं नाव घेत नाही.
Gold Price Today Latest News in Marathi: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढाओढ पाहायला मिळत आहे. एकीकडे लग्नसराईचे दिवस त्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ...असे सुरुच राहिलं तर सर्वसामान्यांसाठी सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करणे आवाक्याबाहेर जाणार आहे. त्यातच एप्रिल महिन्यात लग्नाचे चार मुहूर्त आहेत. अशात जाणकरांच्या मते, या महिन्यात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वर्षातील 365 दिवस म्हणजे सोन्याची खरेदी वर्षभर सुरुच असते. सोन्याचे दर कितीही महागले असले तरी, प्रत्येकजण आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार सोने खरेदी करत असतो. मात्र आता सोन्याच्या किमती अक्षरश: सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दरम्यान 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (18 एप्रिल ) 72,650 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत 73,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. तर चांदी 83,930 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.
महाराष्ट्रातील सोनं-चांदीचे दर
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,477 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,477 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,520 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,477 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 72,520 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66,477 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 72,520 रुपये आहे.
काही दिवसांतील सोनं-चांदीचे दर (विनाजीएसटी)
तारीख – सोने (प्रति तोळा) – चांदी (प्रति किलो)
5 मार्च – 64 हजार 300 – 73 हजार
23 मार्च - 66 हजार 200 - 75 हजार
28 मार्च - 66 हजार 300 - 75 हजार
29 मार्च - 68 हजार 200 - 76 हजार
2 एप्रिल - 68 हजार 700 - 77 हजार
3 एप्रिल - 69 हजार 400 – 78 हजार
5 एप्रिल – 70 हजार 600 – 81 हजार
8 एप्रिल – 71 हजार 800 – 83 हजार
9 एप्रिल - 71 हजार 200 - 82 हजार
12 एप्रिल - 73 हजार - 84 हजार
13 एप्रिल - 72 हजार 030 - 83,380
14 एप्रिल- 72 हजार 030 - 83,380
15 एप्रिल - 72 हजार 030 - 83,380
16 एप्रिल - 73 हजाह 010 - 83,390
17 एप्रिल - 73 हजार 130 - 84,570