सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल! सोनं महाग होण्याचं कारण काय? जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात दरवाढ सुरुच आहे. आजही सोने आणि चांदी महाग झाली असून खरेदीदारांना घाम फुटला आहे. जाणून घ्या आजचे सोनं आणि चांदीचे दर...
Gold Silver Price Today In Marathi : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सोनं आणि चांगी या मौल्यवान धांतूंनी उसळी घेतली आणि किमती पुन्हा एकदा वाढल्या आहे. महिन्याच्या सुरुवातीला सोन्यात भावात तुफान तेजी आली परिणामी, अजूनही ग्राहकांना चढ्या दरानेच खरेदी करावं लागत आहे. देशांतर्गत तसेच परदेशी बाजाराच सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. मध्य-पूर्वेत सुरु असलेल्या तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असून देशांतर्गत बाजारात सोने 420 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही थोडीसी वाढ झाली आहे.
गुडरिटर्सन या वेबसाईटनुसार, सोन्याची किंमत आज (19 मार्च 2024 ) सुमारे 420 रुपयांच्या वाढीसह 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 65,840 रुपये आहे. तर चांदीच्या भाव किरकोळ वाढीसह 75,660 रुपये प्रतिकिलोने विकले जाणार आहे. तर दुसरीकडे सोनं 2024 मध्ये 70 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करणार असाल तर आजचे दर नक्की तपासा.
आज काय आहेत सोनं-चांदीचे दर
आज मंगळवारी (19 मार्च) आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवसाची सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली. बाजार सुरु होताच सोन्याच्या प्रति ग्रॅम भाव आणखी महागले तर चांदीही किंमतही गगनाला भिडले आहेत. मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,344 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,830 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,344 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,830 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,344 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,830 रुपये आहे. तर नाशिकमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,344 रुपये तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,830 रुपये आहे. तसेच डॉलर निर्देशांकात मजबूत घसरण होऊनही कॉमेक्सवर सोन्याची किंमत 2170 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होती. परिणाणी सोनं आणि चांदीचे वाढते दर पाहता, सोनं आणि चांदी खरेदी करायचं की नाही? असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.