Gold Rate : मार्चमध्ये सोनं `इतक्या` रुपयांनी महाग, तर चांदी 78 हजारांच्या घरात, पाहा आजचे दर
Gold Silver Price : मार्च महिना सुरु होताच सोनं आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच आजही सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1500 रुपयांनी वाढ झाली आहे.
Gold Silver Price Today in Marathi : सोनं आणि चांदीच्या दरात दररोज बदल होत असतात. ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदी महाग होत असल्यामुळे ग्राहकांना घाम फुटला आहे. सर्वसामान्यांना आधीच महागाईच्या झळा सोसावे लागत आहे. त्यातच सोनं आणि चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांनी सोनं आणि चांदीची खरेदी थांबवली होती. भविष्यात सोनं स्वस्त होणार की आणखीन महागणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. आज (21 मार्च ) सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. धातुच्या किमती वाढल्याने खरेदीदारांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या 11 दिवसांत सोनं तब्बल 3 हजारांनी महाग झाले आहे. त्यातच आज पुन्ही सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून चांदीचे दर ही गगनाला भिडले आहेत. आज सोनं 67 हजारांवर पोहोचले आहे तर चांदीच्या भावात 1500 रुपयांनी वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 22 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याची किंमत 6,195 रुपये आणि 24 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,570 रुपये असणार आहे. आज सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज प्रति किलो चांदीची किंमत 78,500 रुपये असेल. चांदीच्या दरात 1500 रुपयांची वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील सोनं-चांदीचे दर
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 61,307 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तेच पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61,307 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,880 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 61,307 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,880 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 61,307 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 66,880 रुपये आहे.
सोनं दरवाढी मागे कारण काय?
सराफा बाजारातील तेजीचे कारण म्हणजे यूएस फेडच्या धोरणात दर कपातीची चिन्हे आहेत. बैठकीत (मार्च 2024), यूएस फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्याजदर जसेच्या तसे ठेवून वर्षाच्या अखेरीस तीन व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिले. यामुळे 10 वर्षांचे सरकारी रोखे तयार झाले आणि डॉलरचा पेग रिकामा झाला आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली.