गोंदियातील चार युवकांचा बुडून मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे चार युवक लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील गांगुलपारा येथील जलाशयात सहलीसाठी गेले असता त्यांचा बुडून मृत्यू झाला. चार ही युवक गोंदिया मधील कटंगी इथले रहिवासी होते. यामधे गोलू राठौर वय वर्षे २३, दुर्गेश भूसे वय २३ , विल्सन विजय मदारे वय १९ या तिघांचे मृतदेह जलाशयातून बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही एका युवकाचा शोध सुरू आहे.