प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : वाळू तस्करी करणारा ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात. अचानकपणे ट्रकने ब्रेक मारल्याने ट्रॅक्टर शिरला ट्रक खाली. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरसह 1 शेतमजूर जागीच ठार. 5 शेतमजूर गंभीर जखमी. गोंदियाच्या महालगाव मुर्दडा येथील घटना. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमका अपघात कसा झाला?


वाळू तस्करी करणारा ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये विचित्र अपघात झाला. ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रकखाली शिरला. शेतमजूर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गोंदियाच्या तालुक्यातील महालगांव मुर्दाडा येथे घडली आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टरवरील 5 शेतमजूर गंभीर जखमी झाले आहे. शेतीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्याची लगबग शेताकडे सुरु झाली आहे. तसेच शेतीच्या कामासाठी महेश नागपुरे यांच्या ट्रॅक्टर मजूर घेऊन जात असतांना महालगांव मुर्दाडा गावाजवळ एका वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकने ओव्हर टेक करत अचानक ब्रेक मारला. यात ट्रक्टरच्या ड्राइवरला गाड़ी कंट्रोल न झाल्याने ट्रॅक्टर सरळ ट्रक च्या मागच्या बाजूस शिरला. 


जखमींना तिरोडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच लोकांनी घटनास्थळी  एकच गर्दी केली. संतप्त लोकांनी ट्रक जाळून टाकला, याची माहिती दवनीवाडा पोलिसांना मिळाली असून फरार आरोपी ट्रक चालकाचा शोध सूरु आहे.