अरुण मेहेत्रे, पुणे : कोरोनामुळे (Corona virus) ऑटोमोबाईल ( Automotive Industry ) क्षेत्राला घरघर लागली होती. मात्र लॉकडाऊन उठल्यापासून वाहन विक्री वाढू लागली आहे.  दसरा ते दिवाळी या सणासुदीच्या काळात पुण्यामध्ये (Pune) फोर व्हीलरच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ ऑक्टोबर २०२० ते १५  नोव्हेंबर २०२० या दीड महिन्यात ८४७३ कार्सची तर १८१४३ टू व्हीलर्सची नोंदणी झाली. कार खरेदीचा आकडा हा गेल्या वर्षीपेक्षाही जास्त आहे. वाहन क्षेत्र संकटातून सावरत असल्याचं हे चित्र आहे. 


आरटीओ कडून मिळ णाऱ्या महसुलाचा विचार करता एप्रिल २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ या काळात पुण्यामध्ये एकूण ७५० कोटी ९७ लाख ५९ हजार ९९७ इतक उत्पन्न मिळाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ३३३ कोटी ७० लाख ४७ हजार ३०१ महसूल मिळाला आहे. 


गेल्या वर्षीच्या तुलनेत महसुलात मोठी घट जाणवत असली तरी गेल्या दीड महिन्यात ९० टक्के महसूल मिळालाय. कोरोनानंतर आता वाहन उद्योगाला अच्छे दिन येतील, याचे हे संकेत आहेत.