पुणे : CNG-PNG Price Come Down : महागाईत थोडासा दिलासा देणारी बातमी. अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला आहे. यामुळे 1 एप्रिलपासून सीएनजी-पीएनजी स्वस्त होणार आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे  पेट्रोल डिझेलवरील कर कमी होण्याची शक्यता धुसर आहे. म्हणूनच गॅसवरचा कर कमी केला, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


पेट्रोल,डिझेल महागच राहाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजीकच्या काळात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी होण्याची शक्यता धुसर झाली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल महागच होणार, असे संकेत अजित पवार यांनी दिलेत. इंधन महाग होणार म्हणूनच गॅसवरचा कर कमी केला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी पुण्यात दिली.


नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून राज्यातही कर कमी करण्याची मागणी होत आहे. अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला. पण पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल झालेला नाही.