प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात असलेल्या हरिश्चंद्रगड अभयारण्यातील परीसरात शेकरुंच्या संखेत या वर्षीय वाढ झाल्याच दिसून आलं आहे. ही संख्या वाढल्याने वन्यप्रेमींकडून  समाधान व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात दरवर्षी वन्यप्राण्यची गणना केली जाते. अहमदनगरच्या वन विभागाकडून कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात या वर्षीय शेकरुंची गणती करण्यात आली. त्यात ९७ शेकरू आढळुन आलेत.  या शेकरूंच्या संख्येत यंदा मागील वर्षीपेक्षा दीडपट वाढ झाल्याचे नुकत्याच झालेल्या शिरगणतीनुसार समोर आल्याच वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आलं आहे. या अभयआरण्यात शेकरूंची ३९६ घरटी आढळली आहेत. मात्र, त्यांची संख्या ९७ आहे.



हरीषचंद्र कळसुबाई अभयआरण्य परीसरात पावसाळा सुरू होण्याआधी  शेकरू नवीन घरटी बनवत असतात. त्या आधी शेकरूंची गणना मेमध्ये केली जाते. पहिल्या टप्प्यातील शिरगिणतीत शेकरूंची ही संख्या समोर आली आहेत प्राप्त झाली आहे. हे सर्वेक्षण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू असते. अंतिम आकडा हा जूनच्या मध्यात जाहीर केला जातो. त्यामुळे  शेकरूंचा आकडा वाढू शकतो. 



शेकरुची  वैशिष्ट्ये


वजन दोन ते अडीच किलो, लांबी अडीच ते तीन फूट असलेल्या शेकरूंची डोळे गुंजीसारखे लाल असतात. त्याला मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते.


 शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरू झाडाच्या बारीक फांद्यावर सहा ते आठ घरटी तयार करते. ते १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकते. विविध फळे व फुलांतील मध हे त्याचे खाद्य असते.