ठाणेकरांसाठी खुशखबर, बारवी धरण ओव्हरफ्लो
ठाणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज... बारवी धऱण ओव्हर फ्लो झाल्यानं पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही.
ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज... बारवी धऱण ओव्हर फ्लो झाल्यानं पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही.
धरणात शंबर टक्के पाणीसाठा निर्माण झाल्यावर पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झालीय. बारवी धरणाची उंची वाढल्यावर या धरणाची क्षमता वाढली असून आता धरणात 238 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. यापूर्वी हा साठा १७८ दशलक्ष घनमीटर एवढा होता.
बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर आणि मिरा-भाईंदर या महापालिका आणि औद्यगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो.
सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडल्यानं बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर हे धरण तुडूंब भरुन वाहू लागलंय. या धरणावर दरवाजा बसवण्याचं काम बाकी असलं तरी धरणाची क्षमता साडेतीन मीटरनं वाढलीय. आता धरणातून ३२ क्यूबिक पर सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु झालाय.