Good News From Mumbai Pune Train Passenger:  मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने एक आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने अचानक एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाचा मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असून त्याच्या परिणामांवर का निर्णय कायम ठेवायचा की नाही हे ठरवलं जाणार असल्याचं समजतं. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.


निर्णय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन, लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना 2 मिनिटांचा थांबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय 10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे. लोणावळ्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांना याचा फायदा होणार आहे. या नव्या निर्णयामुळे ट्रेनने लोणावळ्याला जाणं किंवा येणं एकमार्गी सोपं होणार आहे. गाडीला अतिरिक्त थांबा मिळाल्याने लोणावळा स्थानकात प्रवाशांना उतरता आणि चढता येईल. त्यामुळेच आतापर्यंत लोणावळ्याला जाण्यासाठी रस्ते मार्गाला प्राधान्य देणाऱ्या पर्यटकांना रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. लोणावळ्याला रस्ते मार्गे जाताना वाहतूक कोंडीत अडकण्याच्या त्रासापासून पर्यटकांची सुटका होणार आहे.


लोणावळ्यामध्ये कोणकोणत्या ट्रेन थांबणार आहेत हे पाहूयात... 


12163 लोकमान्य टिळट टर्मिनस- एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळ टर्मिनस एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी लोणावळ्यामध्ये रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी पोहचेल आणि 8 वाजून 58 मिनिटांनी पुढील प्रवासासाठी रवाना होईल.


12164 - एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळ टर्मिनस - या एक्सप्रेसला प्रायोगिक तत्त्वावर लोणावळ्यात 10 तारखेपासून थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी लोणावळ्यात दाखल होईल आणि 12 वाजून 42 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान करेल.


11139 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हौसपेठ - या ट्रेनला 10 ऑक्टोबरपासून लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. हा थांबा रात्री 11 वाजून 51 मिनिटं ते 11 वाजून 53 मिनिटांदरम्यान असणार आहे.


11140 - हौसपेठ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अप मार्गावरील या ट्रेनला लोणावळ्यात 2 मिनिटांचा थांबा दिला जाणार आहे. हा थांबा ही ट्रेन रात्री 2 वाजून 5 मिनिटांनी लोणावळा स्थानकात दाखल होईल आणि ती 2 वाजून 7 मिनिटांनी पुढे प्रस्थान करेल. 


लाभ घेण्याचं आवाहन


रेल्वेने उपलब्ध करुन दिलेल्या या नव्या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असं रेल्वेने म्हटलं आहे. तसेच अधिक माहितीसाठी प्रवासी https://www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच एनटीईएस या अॅप्लिकेशनवरही ही माहिती उपलब्ध असल्याचं रेल्वेने म्हटलं आहे.


प्रवाशांना अधिक चांगला प्रवासाचा लाभ घेता यावा या उद्देशाने तसेच लोणावळ्यामधील रेल्वे सेवेला वाढती मागणी लक्षात घेता हा प्रयोग करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.