Good News : Google चे पुण्यात कार्यालय, नोकरीची संधी
Google Office in Pune : आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे.
पुणे : Google Office in Pune : आता गूगलचे कार्यालय पुण्यात पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. कारण Google कडून लवकरच पुण्यात नवीन ऑफिस सुरु करण्यात येणार आहे. गूगलने .(Google Cloud) सोमवारी पुण्यात या वर्षी नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे. (Google to open office in Pune, get job opportunities)
सध्या अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्या भारतात आकर्षित होत आहेत. मोठ्या कंपन्या भारतात आपल्या कंपनीची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्सना जॉब देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आता यात गूगलची (Google) भर पडली आहे.
Googleच्या या योजनेद्वारे एंटरप्राइझ क्लाउड तंत्रज्ञान (Google Cloud) तयार करण्यासाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्यात येणार आहे. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यात Googleचे कार्यालयाल सुरु होईल. Google Cloud सुविधा क्लाउड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, टेक्निकल असिस्टंस आणि जागतिक वितरण केंद्र संस्थांसाठी लोकांना नियुक्त करणार आहे. यामुळे ज्या प्रोफेशन्सलनी क्लाउड किंवा यासंबंधीचे ज्यांनी शिक्षण घेतले आहे त्यांना या नवीन कार्यालयात नोकरीची संधी मिळणार आहे.
गूगलने (Google) देशात गुडगाव, हैदराबाद आणि बंगलोर या प्रमुख शहरांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती सुरु केलेली आहे. त्याचबरोबर आता पुण्यातील कार्यालय सुरु झाल्यानंतर इथेसुद्धा फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलची भरती केली जाणार आहे. आमच्या वाढत्या ग्राहकांसाठी प्रगत क्लाउड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स, उत्पादने आणि सेवा विकसित करत आहोत, असे गूगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.