NCP Crisis In Maharashtra : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे अजित पवार गटात जल्लोषाचे वातावरण आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष साजरा करत आहेत.  राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह मिळाले, पुढे काय करायचे याबाबतच्या सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सूचना करताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. 


अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काय सूचना केल्या आहते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाचा निर्णय कसा योग्य आहे. आपली कायदेशीर बाजू कशी योग्य आहे हे जनतेला सांगावे अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. देवगिरी बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन
 केले.  या निर्णयानंतर सर्वत्र जल्लोष करा अशा सुचना देखील अजित पवारांनी केल्या आहेत. 


अजित पवारांनी घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव


पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार हे पक्ष संघटना आणि पक्ष वाढीवर लक्ष केंद्रित करणार आहेत. लोकसभेच्या कामाला लागा पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. पक्ष संघटन आणि वाढीसाठी काम करा अशा सूचना अजित पवारांनी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. 


निवडणुक आयोगाच्या निकालावर अजित पवार यांतची प्रतिक्रिया


निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्विकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखीन वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही काल ही कटीबध्द होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू हा विश्वास जनतेला देतो.  निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहेत.