पुणे :  सर्वसामांन्याना शिधापत्रिकेवर (Ration Card Holder) अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. शासनाकडून करण्यात येणार हा अन्नधान्य पुरवठा परवडणाऱ्या दरात  केला जातो. त्यामुळे वाढत्या महागाईतही सर्वसामांन्याना काहीसा दिलासा आहे. स्वस्त दरात अन्नधान्य मिळवण्यासाठी शासनाकडून एक ठराविक उत्पन्नाची अट असते. स्वस्तात अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी शासनाने वार्षिक उत्पन्न ठरवून दिलंय. त्या उत्तपन्न मर्यादेच्या आत जर तुमचं वार्षिक कमाई असेल, तरत त्याचा लाभ घेता येतो. (government action will be taken against those who take advantage of cheap grain by showing low annual income at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र काही शिधाधारक हे वर्षोनुवर्ष तेच वार्षिक उत्पन्न दाखवून स्वस्त धान्याचा लाभ घेतायेत. अशा गैरफायदा घेणाऱ्या शिधाधारकांविरोधात शासनाने मोठा निर्णय घेतलाय. पुण्यात वर्षानुवर्षे तेच-तेच वार्षिक उत्पन्न दाखवून अन्न-धान्य लाटणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करणार आहेत.


ज्याचं वार्षिक उत्पन्न हे शासनाने आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांनी स्वत:हून बाहेर पडावं, अशा शब्दात शासनाकडून ठणकावण्यात आलंय. जे शिधाधारक शासनाला सहकार्य करणार नाहीत, त्यांच्याकडून बाजारभावाने अन्नधान्याची वसूली केली जाईल, असं सांगण्यात आलंय.


शिधाधारकांना बाहेर पडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतर पुरवठा विभागाकडून वसूली करण्यात येणार आहे. पुणे विभागाच्या उपायुक्तांनी हा निर्णय घेतलाय.


रेशन दुकानाची तोडफोड


पुण्यातल्या वेल्ह्यात चोरट्यांनी रेशनचं दुकान फोडलंय. चोरट्यांनी रेशन दुकानाची भिंत फोडून गव्हाची 125 पोती चोरी केल्या.. याबाबत रेशन दुकानदार बळीराम आधवडे यांनी वेल्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.