मुंबई : भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र निजामाच्या तावडीतील हैद्राबाद संस्थानाने भारतात विलीनीकरण केलं नव्हतं. त्यामुळे जुलमी निजामाच्या राजवटीत पोलीस ऍक्शन करून हैद्राबाद संस्थानासह मराठवाडा हा १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वतंत्र झाला. यासाठी मराठवाड्यातील अनेकांनी हौतात्म्य पत्कारले होतं. त्यानिमित्त लातूरमध्येही मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभावर करण्यात आले. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तर पोलिसांनी हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. 



यावेळी गणेश विसर्जनाचा 'लातूर पॅटर्न  निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरवही करण्यात आला. येत्या काळात लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाणी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केलं.