मुंबई: दूधाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली पुकारण्यात आलेला संप मोडीत काढण्यासाठी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी पुढाकार घेतला. महादेव जानकर यांनी गुरुवारी यासंदर्भात भाष्य केले. मुंबईसह इतर शहरांना दुध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दुधाच्या टँकर्सना संरक्षण देणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच दूध भुकटीसाठी अनुदान देणार असल्याचेही जानकरांनी म्हटले.राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर गायीच्या दूधाला ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय १५ जुलैपर्यंत न घेतल्यास १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. 

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांतून एक लिटरही दूध मुंबईकडे जाणार नाही अशी व्यवस्था केली जाईल व त्यातून जी परिस्थिती उदभवेल त्यास सरकार जबाबदार असेल असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.