ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या तरण्याताठ्या मुलाचा मृत्यू, कोल्हापूरमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना!
ग्रामपंचायत बिनविरोध जिंकली पण काळाने केला घात, आयुष्याच्या `संग्रामा`त संग्रामचा झाला पराभव!
Sangram SitaRao Guruv passed away kolhapur : काही दिवसांपुर्वी राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका (Grampanchayat Election Result Maharashtra) पार पडल्या यामध्ये भाजप आणि शिंदे गटाने वर्चस्व राखल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीने गावातील वातावरण अजुनही तापलेलं दिसत आहे. काही ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत उमेदवारांची थेट बिनविरोध निवड झाली. (Grampanchayat Member Sangram SitaRao Guruv marathi news) अशातच गुलाल उधळून काही दिवस झाले नाहीतर कोल्हापूरमधील एका बिनविरोध निवडून आलेल्या तरूण सदस्यावर काळाने घाला घातला आहे. (Grampanchayat Election member Sangram SitaRao Guruv passed away kolhapur Karvir marathi News)
नेमकी कुठे घडली घटना?
कोल्हापूरमधील (Kolhapur) करवीर (Karvir) तालुक्यामधील सडोली दुमालात (Sadoli Dumala) ही दुर्देवी घटना घडली आहे. संग्राम सीताराव गुरव असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. सडोली दुमालातील वार्ड नंबर 3 मधून संग्रामची बिनविरोध निवड झाली होती. संग्रामला चार दिवसांआधी ताप आला होता त्याने गावामध्येच उपचार घेतले होते. उपचारावेळी संग्रामला डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याचं समोर आलं.
संग्रामची प्रकृती आणखीनच बिघडली त्यानंतर त्याला उपचारासाठी त्याला कोल्हापूरमध्ये हलवण्यात आलं. तिथे दाखल केल्यानंतर त्याला डेंग्यूसोबत काविळची लागण झाल्याचं समोर आलं. उपचारादरम्यान संग्रामची प्रकृती खालावत गेली आणि अखेर संग्रामचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पंचकृषीत पसरली. आताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याची बिनविरोध निवड झाली होती. सलग दुसऱ्यांदा सदस्यपदी निवड झालेल्या संग्रामच्या अशा मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, संग्रामने ग्रामपंचायत बिनविरोध जिंकली, गुलाल उधळला पण संग्राम त्याच्या आयुष्याच्या 'संग्रामात' हरला. गावातील वारकरी संप्रदयाशीही तो जोडला गेला होता. संग्रामच्या अशा अचानक एक्झिटची तालुक्यातच नाहीतर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.