मुंबई : Private bus fare hike : काही दिवसांवर गणपती उत्सव (Ganpati Utsav) आहे. त्यामुळे प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे वसूल करता येणार नाही. जर कोणी असे जास्तीचे पैसे वसूल केले तर त्यांच्याबाबत तक्रार करता येणार आहे. त्यानुसार अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर राज्यातील सर्व आरटीओ (RTO) आता कारवाई करु शकतात. तसे याबाबत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सण आणि उत्सावात भक्तांची खासगी प्रवासी बस  वाहतूकदारांकडून लूट करण्यात येत असते. आता याला चाप लावण्यासाठी परिवहन विभागाने निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवकाळात जादा भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन विभागाने या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना दिले आहेत.


सणासुदीच्या दिवसांत मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. ही सेवा देत असतानाच त्याच मार्गावर खासगी बसेसही धावत असतात; परंतु त्यांच्याकडून जादा भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जाते. त्या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस पाहता गर्दीच्या हंगामात खासगी बसगाड्यांना प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त भाडे राहणार नाही, असे दर शासनाने 2018 मध्येच निश्चित केले आहेत. तरीही खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारणी केल्याच्या तक्रारी येत असतात. आता तुम्हाला थेट mvdcomplaint.enfs@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवता येणार आहे.


दरम्यान, खासगी प्रवासी वाहतूकदारांना ज्या ठिकाणाहून खासगी बसेस सुटतात, त्या ठिकाणापासूनचे किलोमीटरप्रमाणे भाडेदराचा तक्ता प्रसिद्ध करावा. तरीही अधिक दर आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओंना परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. खासगी प्रवासी बसमधून प्रवास करताना अडचणी आल्यास mvdcomplaint.enfs@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.