मुंबई : महाराष्ट्रात यापुढं तंबाखुजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ एकाच दुकानात विकायला बंदी असेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आलीय. 


तंबाखू आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये अनेकदा चिप्स, बिस्किटं, चॉकलेट्स वगैरे खाद्यपदार्थ विकले जातात. यापुढं असा प्रकार आढळला तर अशा दुकानांवर कारवाई करण्यात येईल. 


लहान मुलांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी गेल्या वर्षीच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने याबाबतचे निर्देश जारी केले होते. मात्र, त्याचं पालन करण्याची सक्ती कुठल्याही राज्यावर नव्हती. हे निर्देश लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे.