लातूर : लग्नात, वाढदिवसाच्या कार्यक्रमात हातात तलवार, कोयते घेऊन नाचण्याचा तरुणांमध्ये ट्रेंड वाढत चालला आहे. यामागे आपली दहशत पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण कधीकधी हे उद्योग त्यांच्या चांगलेच अंगाशीही येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच एक प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे या तरुणाचा लग्नसमारंभ होता. हळदीच्या कार्यक्रमात त्याचे काही मित्र सहभागी झाले होते. गाण्यांच्या तालावर त्यांनी ठेका धरला होता. यावेळी काही तरुणांनी हातात तलवार आणि कोयते घेतले होते. 


मित्रांच्या या कृत्यामुळे नवरदेव चांगलाच अडचणीत सापडला आहे. सार्वजनिक ठिकाणी जवळपास दीड तास हा गोंधळ सुरु होता. .याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला आणि याची माहिती विवेकानंद पोलिसांना मिळाली. 



त्यामुळे पोलीस कारवाईच्या भीतीने नवरदेव फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी नवरदेवाच्या मित्रांना ताब्यात घेतलं आहे.