पंढरपूर : जीएसटी करप्रणालीचा फटका पंढरपूरला येणाऱ्या गरीब वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दिला जाणारा लाडू प्रसाद महाग होणार असल्याचं सुतोवाच मंदिर समितीच्या प्रभारी कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे.


सध्या जीएसटीमुळे डाळ, तेल आणि इतर खर्चात वाढ झाल्यानं प्रत्येक लाडुमागे मंदिर समितीला ३ रुपयांचा तोटा होतोय. सध्या लाडू ५ रुपयांना दिला जातो. 


आतापर्यंत मंदिर समिती प्रत्येक लाडुमागे २ रुपये नुकसान सहन करून हा लाडू भाविकांना द्यायची. त्यामुळं आता समितीच्या वइषय पटलावर दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे.