ठाणे : आज गुढीपाडवा... हिंदू नववर्षाचा पहिला दिवस... या नववर्षाचं स्वागत उत्साहात तर व्हायला हवंच... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी सकाळपासूनच ठिकठिकाणी शोभायात्रा आणि विविध रॅलीज निघाल्यात. ठाण्यातील गुडीपाडव्याच्या शोभा यात्रेला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.


यात प्रामुख्याने महिला वर्गाने एक भव्य बाईक रॅली काढली होती... पारंपरिक पोशाख परिधान करून लहान मुलांसोबतच महिलाही रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. 


बाईकस्वार झालेल्या या जिजाऊंनी या माध्यमातून अनेक सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.