जळगाव : राज्यभरातून त्यांनी केलेल्या वक्तव्यबद्दल अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला आणि झाल्या प्रकारची त्यांनी माफी मागितली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील बोदवड येथे निवडणूक प्रचारादरम्यान एक वादग्रस्त विधान केलं. आपल्या मतदारसंघातले रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे आहेत, असे वक्त्यव्य करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.


मात्र, हे विधान त्यांच्या चांगलंच अंगलट आलं. या विधानावरून अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जाहीर माफी मागा अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला होता. तर, भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.


राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांना खडसावल्यानंतर गुलाबरावांनी माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.


पाटील यांनी आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागतो. हेमा मालिनीच्या गालांशी तुलना बॊलण्याच्या ओघात झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.