Gulabrao Patil Singing Qawwali Video Viral : राजकारणातील मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीचं दर्शन सर्वांनाच घडवलं. निमित्त होतं ते म्हणजे उरुस कार्यक्रमाचं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेष स्थान असणाऱ्या आणि राज्याच्या मंत्रीमंडळात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री अशा पदांची जबाबदारी असणाऱ्या गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी त्यांच्या गायकीनं सर्वांनाच वेड लावलं. 


... आणि गुलाबराव गाऊ लागले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावमदील नशिराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या उरूसमध्ये गुलाबरावांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी त्यांनी थेट कव्वाली गात समां बांधल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणातून विरोधकांना घायाळ करणारे आक्रमक नेते म्हणून गुलाबराव पाटलांना ओळखले जाते मात्र हेच गुलाबराव नशिराबाद येथील हजरत पीर सय्यद बदियोदिन अहमद शाह यांच्या उरूस कार्यक्रमात खास गायकी शैलीत पाहायला मिळाले. 'चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा...' ही कव्वाली गाऊन गुलाबराव पाटलांनी उपस्थितांची उत्फूर्त दाद मिळवली. 


हेसुद्धा वाचा : "कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचा भाजपला तळतळाट"; चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचा घणाघात


गुलाबरावांचा हा अंदाज अनेकांसाठी नवा होता. त्यातही त्यांच्या तोंडपाठ असणारी कव्वाली आणि ती सादर करण्याची शैलीही तितकीच खास आणि पाहण्याजोगी होती. जनमानसातील नेता जेव्हा सर्वसामान्यांच्या बरोबरीनं वावरतो तेव्हा नेमकं काय घडतं हेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पाटील यांच्या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. 



गुलाबराव पाटलांची लोकप्रियता वाखाणण्याजोगी (Gulabrao Patil Video Viral)
शिवसेनेसाठी (Shivsena) राजकारणात स्वत:ला झोकून देणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची वाट धरली. (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी ज्या नेतेमंडळींच्या जोडीनं शिवसेनेतून काढता पाय घेतला त्यात गुलाबराव पाटील यांचाही समावेश होता. पानटपरीपासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास पाहता अनेकांनाच त्यांचा हेवा वाटतो.