COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगर : शेफारलेल्या गावगुंडांचा सर्वसामान्यांना कसा त्रास होतो, याचं उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातल्या एका घटनेमुळं पुढं आलंय. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीकमध्ये गावगुंडांनी अल्पवयीन मुलीला अश्लील शिवीगाळ करुन मारहाण केली आहे. (वरील व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्शी यांनी त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर केला आहे)


मडके वाडीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला सुनील बोनगे आणि सागर, नवनाथ आणि गोरख या तीन मुलांनी तीच्या घरी जाऊन मारहाण केली. 


दरम्यान, या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तब्बल आठवड्यानं चौघांवर विनयभंग, अॅट्रॉसीटी आणि बाललैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.


आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नसून फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.