पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. भाजपच्या नेत्यांकडूनही वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरूषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आज मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्यात आलाय. यामध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. भाजप खासदार आणि नेते उदयनराजे भोसलेही बंदमध्ये सहभागी झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात बंद आणि मोर्चा बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. इतकंच नाहीतर बंदमध्ये सहभागी झालेल्या उदयनराजे यांना अटक करा अशी मागणीही सदावर्ते यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की बंद हे बेकायदेशीर असताना आज पुण्यामध्ये बंद करण्यात आल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.


कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू असून हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुण्यात सुमारे साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


साडेतीन वर्षांनंतरही जनमानसातील महाराजांबद्दलचा आदर कमी झाला नाही. महाराजांपुढे पक्ष दुय्यम असून काही तुटपूंजे, फुटकळ विकृत लोक लोकं अनावश्यक विधान करत आहेत. नुपूर शर्मांबाबत जशी कारवाई केली तशी कोश्यारींवरही करण्यात यावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.