Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी
सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी
सातारा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavart) यांनी छत्रपती घराण्यासंदर्भात बदनामी करणारं वक्तव्य केलं होतं. तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य असल्याने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाली होती.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सत्र न्यायालायने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाताना सातारा पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या आवारात पोलीस फौजफाटा होता.
दरम्यान, मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त सदावर्तेयांच्यावर पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. चिथावणीखोर भाषण करत कामगारांची माथी भडकवल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.