सांगली / सोलापूर : Gunaratna Sadavarte Against FIR in Sangli-Solapur : वकील गुणरत्न सतावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सांगलीतील मिरज पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी आता सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सांगली आणि सोलापूर पोलीस चौकशीसाठी त्यांचा  ताबा मागू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सांगलीमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी सदावर्ते यांनी युट्युबवर एक व्हिडियो टाकला होता. या व्हिडिओमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.


सोलापुरात दुसरा गुन्हा दाखल


गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सोलापुरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणविषयी 5 मे 2021 रोजी आक्षेपार्ह विधान केल्याचा सदावर्ते यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, मराठा संघटना यांच्याविरोधात बोलताना जातीय विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


सकल मराठा समाज संघटनेचे माऊली पवार यांनी गुणरत्न सदावर्ते  यांच्याविरोधा फिर्याद दाखल केली. माऊली पवार यांच्या फिर्यादीवरून 153 अ, 153 ब, पोलीस अप्रितीची भावना चेतवने अधिनियम कलम 3 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी सोलापुरातल्या याच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदावरते यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.