अंबडमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
रॉकेल टाकून जाळले
धक्कादायक बाब म्हणजे भर रस्त्यावर हा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असून या तरुणाच्या मृतदेहावर रॉकेल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येतेय. पोलिसांना या मृतदेहाजवळ अनंत श्रीकांत इंगोले या तरुणाचं आधारकार्ड मिळाल्यानं पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतायत.
कागपत्रांच्या आधारे माहिती
रस्त्यावरून प्रवास करणा-या प्रवाशांना हा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी गोंदी पोलिसांना प्रकाराची माहिती कळवली. त्यानंतर लगेचच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाजवळ काही अंशी जळालेली कागदपत्र ताब्यात घेतली. या कागदपत्रात पोलिसांना बीड जिल्ह्यातील समनापूरमधील तरुणाचं आधारकार्ड आढळून आल्यानं त्यांनी बीड पोलिसांनाही पाचारण केलं.