पुणे : ६३ व्या महाराष्ट्र केसरीचा दावेदार कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. हर्षवर्धन सदगीर हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील खुल्या गटात नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात ही कुस्ती रंगली. ३-२ ने हर्षवर्धन सदगीरने शैलेश शेळकेवर मात केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षवर्धन आणि शैलेश यांच्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर याने बाजी मारली. दोघेही काकांच्या तालमीत असल्याने त्यांना एकमेकांचे डाव माहीत होते. त्यामुळे ही लढत रंगतदार झाली होती.


हर्षवर्धन हा गेल्या ६ महिन्यापासून कसून सराव करत होता. २००९ पासून तो पवार यांच्या तालमीत आहे. शैलेश देखील दररोज सहा तास मेहनत करत होता. २०१५ पासून तो देखील काकांच्या तालमीत सराव करत आहे.