सांगली -: ब्रिटिशांविरूद्ध लढणारे क्रांतिसिह नाना पाटील यांच्या कन्या  क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे आज निधन झाले. कराडमधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील आजारी होत्या.  आज कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , सुना नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.


हौसाताई पाटील यांनी क्रांतिसिंहांच्या बरोबरीने भूमिगत कारवायांमध्ये मुख्य भूमिका बजावली. त्या इंग्रजांच्या माहिती गोळा करून त्या भूमिगत क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत होत्या.