संगमनेर : सध्या इतकं तापमान वाढलं आहे की, आपण उकाड्यापासून वाचण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून, स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शरीराला पाणी मिळावे आणि ते आतमधून थंड आणि शांत रहावे, यासाठी आपण भरपूर प्रमाणात फळे देखील खातो. असेच एक उन्हाळ्यात नेहमीच खाले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. आपल्याला कलिंगड म्हटलं की, बाहेरुन हिरवागार दिसणारा आणि आतून लाल गडद रंगाचा, रसाळ असं फळ डोळ्यासमोर दिसतं. पण जर आम्ही तुमचा कलिंगडाकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर, आतून लाल असलेला कलिंगड पिवळा निघाला तर? तो तुम्ही खाल? नाही...तुम्ही जसा विचार करताय तसा हा कलिंगड खराब वैगरे झालेला नाही. हा कलिंगड विदेशातून आलेला आहे. तसे याची शेती ही भारतातच केली गेली आहे. ते ही संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे. परंतू याच्या बीया या तैवानवरुन आणलेल्या आहेत.



संगमनेरमधील घारगाव येथील किरण धात्रक असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. पिवळ्या आरोही जातीच्या कलिंगडाच्या बीया ऑनलाईन मागवले आणि त्याची लागवड करून सर्वांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.


काय आहे नेमक हे पिवळ्या कलिंगडाचे पिक?


विदेशात पिवळ्या कलिंगडाची लागवड करण्यात येते याची माहिती किरणने इंटरनेटच्या माध्यामातून मिळवली. त्या बियाना तैवाननच्या एका कंपनीकडून ऑनलाईन मागवले. या आरोही जातीच्या बियानाचे नर्सरीत रोपे तयार केले.


ते रोप त्याने आपल्या एक एकर क्षेत्रातल्या शेतात बेड त्यावर मल्चिंग पेपर टाकत लागवड केली. सहसा या भागात लाल कलिंगडाचीच लागवड केली जाते. मात्र या शेतकऱ्याने थोड पुढे जाऊन पिवळ्या कलिंगडाची लागवड केली. आता त्यास चांगली फळेही आली आहेत.


धात्रक यांनी लावलेल्या  या कलिंगडाचा रंग बाहेरून हिरवा आणि आतून पिवळा आहे. या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाचा आकार लाल कलिंगडाप्रमाणेच आहे. परंतु  तो कापला जातो तेंव्हा लालऐवजी पिवळ्या रंगाचा कलिंगड असल्याचे दिसतो.



यासाठी किरणला एकरी साठ हजार रुपये खर्च आला आहे. 75 ते 80 दिवसात हे पीक, काढणीला आलं आहे. तर शेतात सुमारे 200 क्विंटल पेक्षा जास्त पिवळ्या कलिंगडाचे उत्पादन झाले आहे.
सध्या लाल कलींगडाला आठ ते दहा रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. त्यामुळे वेगळ्या असलेल्या या पिवळ्या कलिंगडास पंधरा रुपयांच्या वर भाव मिळेल असा विश्वास किरणला आहे.


तर आता जर तुम्हाला बाजारात पिवळ्या रंगाचं कलिंगड दिसलं तर, चक्कीत होऊ नका. ते नक्की विकत घ्या आणि विदेशी फळ भारतात खाण्याचा आनंद घ्या. भारतीय शेतकऱ्याला असे वेगवेगळे प्रयोग करायला प्रोत्साहित करा.