HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या `या` निर्णयामुळं ग्राहकांचे EMI वाढणार
HDFC Bank Interest Rates: HDFC बँकेची कर्ज आता महागणार आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.
HDFC Bank Interest Rates: देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँक HDFCने ग्राहकांना दिवाळीनंतर मोठा धक्का दिला आहे. HDFCने काही काळासाठी कर्जावरील MCLR वाढवण्यात आली आहे. त्यामुळं तुम्ही जर घर किंवा कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी कर्ज महागणार आहेत. म्हणजेच कर्जावरील EMI किंवा व्याज आधीपेक्षा जास्त भरावा लागणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांचे आधीपासून कर्ज आहे त्यांच्या EMIमध्ये वाढ होणार आहे. HDFC Bankने MCLR 0.05 टक्क्यांने वाढवले आहे.
HDFC बँकेने वाढवले MCLR दर
बँकेने MCLR रिव्हाइज करुन गृहकर्ज, पर्सनल कर्ज आणि ऑटो लोनसहीत सर्वप्रकारच्या फ्लोटिंग लोनवर त्याचा परिणाम होऊ शकतो. MCLR वाढल्यानंतर कर्जावरील व्याज वाढते तसंत, ग्राहकांच्या EMIमध्ये वाढ होते. हे नवीन दर 7 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहेत. एचडीएफसी बँकेने सहा महिने आणि तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीपर्यंत MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवले आहे. फंड बेस्ट लँडिग रेट एमसीएलआर बेंचमार्क मार्जिनल कोस्ट 9.15 ते 9.50 टक्क्यांदरम्यान आहे.
बँकेने एक महिन्यासाठी 5 बेसिस पॉइंट आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी 3 बेसिस पॉइंटपर्यंत व्याज दरात वाढ केली आहे. बँकेने या दोन कालावधीव्यतिरिक्त इतर कोणत्याही कर्जात बदल केले नाहीत. ओव्हरनाइट MCLR 9.10 टक्क्यांवरुन 9.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे एका महिन्याचा MCLR 9.15% वरून 9.20% वर वाढला आहे. बँक तीन महिन्यांच्या कालावधीसाठी 9.30% ऑफर देते. सहा महिन्यांच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे. एका वर्षाच्या कालावधीसह MCLR 9.45% आहे, जो ग्राहकांच्या कर्जाशी जोडलेला आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR 9.45% आणि तीन वर्षांसाठी 9.50% आहे.
रेपो रेट व्यतिरिक्त, विशेष गृहकर्जाचा व्याज दर 2.25% ते 3.15% म्हणजेच 8.75% ते 9.65% पर्यंत असतो. याशिवाय, पगारदारासाठी मानक गृहकर्ज दर रेपो दरापेक्षा 2.90% ते 3.45% अतिरिक्त आहे. म्हणजे ते 9.40% वरून 9.95% पर्यंत वाढतो.
MCLR म्हणजे काय?
एमसीएलआर ठरवण्यापूर्वी अनेक मुद्दे लक्षात घेतले जातात. बँकांनी दिलेले कर्ज व्याजदर पारदर्शक आणि प्रमाणित करण्यासाठी MCLR चा वापर केला जातो. MCLR बँकांच्या सध्याच्या निधीच्या खर्चावर आधारित आहे. रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम एमसीएलआर रेटवर पडतो. एमसीएलआरमध्ये बदल झाल्यास कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होतो. त्यामुळं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा EMI वाढतो.
ऑटो लोन, होम लोन आणि पर्सनल कर्जा महागणार
एमसीएलआरचे दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा थेट परिणाम होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह इतर कर्जांवर होतो. MCLR वाढल्यानंतर लोन ग्राहकांना आधीपेक्षा जास्त EMI द्यावा लागणार आहे. तर, नवीन लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी कर्ज महागणार आहेत.