भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलिस स्टेशनअंतर्गत एक धक्कादायक घटना घडलीय. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी 376, 363 व पॉक्सोन्वये गुन्हा नोंद करत त्या नराधम आरोपीला अटक केलीय. राजेश ईश्वर मडावी ( वय 19 वर्ष, राहणार बोदरा ) असं अटक करण्यात आलेल्या त्या आरोपीचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडाराच्या साकोली येथून आरोपी राजेशनं त्या अल्पवयीन मुलीला नागपूरला फिरवायला नेतो असा बहाणा केला. त्याने रात्रीची बस गाठली. त्यात ते दोघे बसले. रात्रीची वेळ. गाडीत वाहक नसल्याने त्याने शेवटची सीट गाठली. गाडीत प्रवासीही कमी असल्याने त्यानं त्या संधीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला.


नागपूरला पोहोचल्यानंतर राजेश तिला आपल्या नातेवाइकाकडे घेऊन गेला. नातेवाईकाने त्या दोघांकडे पाहिलं. त्याला संशय आला आणि त्यानं त्या दोघांना ताबडतोब आपल्या घरातून निघून जाण्यास सांगितलं. आरोपीचा नाईलाज झाला. त्यामुळे रात्रीच राजेश अल्पवयीन विद्यार्थिनीसह नागपूरला बोदरा येथे परतले.


इकडे, त्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा त्यांना बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता विद्यार्थिनी राजेशसोबत गावातच असल्याची माहिती दिली.


पोलिसांनी बोदरा गाव गाठले आणि त्या अल्पवयीन विद्यार्थिनी व राजेश मडावी यांना ताब्यात घेतले. दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्या आधारे पोलिसांनी आरोपी राजेश मडावी याच्यावर कलम भादंवि 376, 363 आणि पॉक्सोन्वये गुन्हा दाखल केला.