स्वाईन फ्लूने कर्मचारी दगावल्यानंतर आरोग्य खात्याला जाग
स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे.
नाशिक : स्वाईन फ्लूमुळे कर्मचा-याचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासस खडबडून जागं झालं आहे. पदाधिका-यांनी अधिका-यांना धारेवर धरत साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्यात. नाशिक शहरात स्वाईन फ्लूने थैमान घातलं असताना आरोग्य विभाग सुस्त होता.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळेत बळींची संख्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली. दुर्दैवाने त्यात महापालिकेचे कर्मचारी सुनील पवार यांचाही समावेश आहे. पवार यांच्या मृत्यूने मनपा प्रशासनाला आता कुठे जाग आली असून तातडीच्या बैठकीनंतर स्वाईन फ्लूसह इतर साथीचे आजार आटोक्यात आणण्याच्या सूचना अधिका-यांना देण्यात आल्यात.