मुंबई : राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी शनिवारी आणि रविवारी लेखी परीक्षा होत आहे. या परीक्षेच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. या परीक्षेत दत्ता पातूरकर या परिक्षार्थीला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आल आहे. त्याच्या प्रवेश पत्रावर नोएडा सेक्टर 55 असं छापून आलंय. केवळ पुणेच नाही तर वाशिममधल्या एका विद्यार्थ्यालाही नोएडाचं सेंटर आलंय. त्यामुळे आरोग्य सेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दत्ता पातूरकर पाठोपाठ वाशिमच्या अक्षय राऊत या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबतही गोंधळ झाला आहे. या उमेदवाराला नोएडाचे सेंटर आले आहे. तसेच असाच प्रकार नाशिकच्या उमेदावारासोबतही घडला आहे. 



आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया 


सार्वजनिक आरोग्य विभागाच्या होऊ घातलेल्या परीक्षाचे नंबर उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे आले आहेत,पण हे केवळ नाशिक जिल्ह्यातील भिगवणच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडले आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले,बहुतेक सदर सर्वर उत्तर प्रदेशात वापरले गेले असावे म्हणून अस झालं असावं असं ही ते म्हणाले.


आरोग्य सेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात अशी मागणी आता एमपीएससी विद्यार्थी कृती समितीमार्फत करण्यात आली आहे.