नागपूर : विदर्भात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यात उष्माघातानं तिघांचा बळी गेला. मृतांमध्ये एका नवजात बालिका आणि तिच्या आईचा समावेश आहे. 


नागपूर आणि चंद्रपुरात मागच्या आठवड्यात पारा ४८ अंशापर्यंत गेला होता. येणाऱ्या दिवसांत तापमानाचा पारा ४५ अंशावरच राहणार असल्याचं सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.