रायगड : 7 ते 8 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या 24 तासांमध्ये रायगड जिल्हयात दमदार हजेरी लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हयातील अलिबाग, नागोठणे, पेण , कर्जत, उरण, खोपोली  याभागात रात्री उशिरा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. 


नागोठणे शहर आणि परीसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नागोठणे येथे कोळीवाडा , एस. टी स्टँड परिसरात पाणी शिरल. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झालाय. आता पूराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे .


पावसासोबत येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे जिल्हयाच्या अनेक भागात वीजपुरवठा वारंवार खंडीत होण्याचे प्रकार घडले. उत्तर रायगडात पाउस असला तरी दक्षिण रायगडात आजही पावसाची प्रतीक्षा आहे .