४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
![४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता ४८ तासात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/09/20/246154-nagpurrain.jpg?itok=Z_3IVCIZ)
येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे.
नागपूर : येत्या ४८ तासांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे. यामुळे वेधशाळेनं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
आज आणि उद्या विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भाशिवाय शेजारच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.