राडयगड: पालघर जिल्ह्यामध्ये आठवड्यापासून दमदार पाऊस पडतोय. त्यामुळे येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नद्या, नाले सध्या तुडुंब भरून वाहत आहेत. धरणक्षेत्रात मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसामुळे सूर्या नदीवरील धामनी धरण हे ७७ टक्के भरलंय. या धरणाचे पाचही दरवाजे सध्या उघडण्यात आलेत. धामनी धरणातून ७ हजार ४०० क्यूसेस पाण्याचा सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. याच धरणाखाली कवडास बंधारा असून तो देखील सध्या ओव्हरफ्लो झालाय. त्यामूळे धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.


पालघरमध्ये सतर्कतेचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर जिल्ह्यात गेल्य सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.  दरम्यान कालच्या भरतीनं पालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप पहायला मिळालं. काल समुद्राला सर्वात मोठी भरती होती. या भरतीनं सागरात पाच मिटर उंचीच्या लाटा उसळल्या. या लाटांचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावाला बसला. किलनाऱ्यालगत वसलेल्या सातपाटी गावात समुद्राचं पाणी शिरलं. खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.


मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज 


येत्या २४ तासांत मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. आजही समुद्राला मोठी भरती असणार आहे. दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनी समुद्राला भरती येईल यावेळी ४. ९७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिलाय.