सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस, घरात पाणी शिरल्यानं नुकसान
मालवण आणि वेंगुर्ल्यात रात्री मुसळधार पावसानं शहराच्या सखल भागात पाणी शिरलं.
सिंधुदुर्ग : मध्यरात्रीच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मालवण आणि वेंगुर्ल्यात रात्री मुसळधार पावसानं शहराच्या सखल भागात पाणी शिरलं.. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. मालवण घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल होतं. त्यांच्या घरातील वीजेच्या यंत्रणांसह अनेक जीवनावश्यक वस्तुचं मोठे नुकसान झालं. वेंगुर्ले तालुक्यातील कोचेरे येथे मधुकर सखाराम केरकर कुटुंब पाण्यात अडकल होते. रात्री ४ वाजता त्याना बाहेर काढण्यात आलं. पावसाचा जोर सकाळी ओसरला असला तरी पावसाने मोठे नुकसान झालं आहे.