यवतमाळ : यवतमाळला अचानक धुंवाधार पावसाने झोडपले. तासभर सोसाट्याच्या वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पावसाचा एवढा जोर यवतमाळकरांनी अनुभवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोरदार पावसामुळे नाले पाण्याने भरून वाहू लागले. तर रस्त्यांवर देखील पाण्याचे लोट होते. शहरातील सखल भागात पाणी साचले. यवतमाळात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला असून धरणात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यामुळे आणखी मुसळधार पावसाची प्रतीक्षा यवतमाळकरांना आहे. जेणेकरून धरणं पाण्याने भरावी आणि भूजल पातळी वाढावी अशी अपेक्षा नागरिकांना आहे.