COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आता बातमी पावसासंदर्भातली... येत्या २४ तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय.


या ठिकाणी पावसाची शक्यता


पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, लातूर आणि नांदेडमध्ये पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केलीय.


वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता


वाऱ्याचा वेग जास्त असेल, तसंच संध्याकाळच्या सुमारास वादळी पावसाची शक्यता जास्त आहे. मे महिन्यात नेहमीच अशी परिस्थिती निर्माण होते. उत्तर भारतातल्या धुळीच्या वादळाचा परिणामही हवामान बदलावर झालेला दिसून येतो.


२४ तासांत उष्णतेचा इशारा


परभणी, जळगाव आणि नांदेड जिल्ह्यात पुढच्या २४ तासांत उष्णतेचा इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्यात नियमित तापमानापेक्षा अधिक तापमान असेन असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. हे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक  असण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. 


म्हणून महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरलीय


भारता शेजारील बलुचीस्थान, सिंध प्रांत आणि पाकिस्तान येथील वाळूच्या भागातील उष्ण तापमान हवेच्या माध्यमातून भारतात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरलीये. 


सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत गरम हवा वाहत असून यामुळं उष्मांघात होण्याची दाट शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीये.