Pune Rains : सोमवारी रात्री 9.30 वाजण्यानंतर पुण्यात पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली (Pune Heavy Rains). पुण्यातला पाऊस इतका धडकी भरवणारा होता, की अनेकांनाच 2019 च्या पुराची आठवण झाली. दक्षिण आणि मध्य पुण्यामध्ये पावसानं लावलेली हजेरी अनेकांनाच महागात पडली. पुण्यातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले. पाण्याची पातळी बघता बघता इतकी वाढली, की पुण्याच्या रस्त्यांवर लाटा उसळू लागल्या. जणू काही समुद्रालाच उधाण आलं. या लाटा होत्या पावसामुळं तुंबलेल्या पाण्याच्या (waterlogging). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



दरम्यान पुण्यातील पावसामुळं विविध भागात पाण्यात अडकलेल्या जवळपास 12 जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. रात्रभर तुफान पाऊस कोसळत असल्यामुळं येथील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं रूप आलं होतं. अनेक भागात झाडं कोसळली, त्यात काही जण जखमी झाले.


पुण्यात सुखसागर नगर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारूवाला पूल, हडपसर गाडीतळ, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, नारायण पेठ, मोदी गणपती, औंध, डीएव्ही स्कूल गल्ली, पर्वती पायथा भाग, मित्रमंडळ चौक, गंजपेठ या भागात प्रचंड पाणी साचलं होतं.अनेक घरात पाणी शिरल्यामुळे लोकांची रात्र जागून गेली.




पर्वती, रमणा गणपती भागात भिंत कोसळण्याचे प्रकार घडले तर हडपसर, आकाशवाणी, चंदननगर, बिडी कामगार वसाहत या भागात रिक्षावर झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. मंगळवार पेठेत स्वरूपवर्धिनीजवळ एक कुटुंब पाण्यात अडकलं होतं. त्यांना अग्निशमन दलानं वाचवलं. कोंढवा खुर्द भाजी मंडईलगत 7 नागरिक पाण्यात अडकले होते. त्यांना वाचवण्यात आलं.


अधिक वाचा : वाचवा वाचवानंतर पुण्यात आणखी एक ड्रामा, भाऊ थेट रस्त्यावरच झोपला... पाहा Video


पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ मंदिरातही (Pune Dagdusheth halwai ganpati mandir) पाणी शिरलं होतं. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरातील पाणी बाहेर काढण्यात आलं. तर तिथे श्रीमंत भाऊ रंगारी गणपती (Bhau Rangari gapnati) ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पावसाचा फटका बसला. संग्रहालयातील खुर्च्या तसंच इतर साहित्य पाण्याखाली गेलं होतं. पाणी बाहेर काढताना कार्यकर्त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.