परभणी : Heavy rains in Parbhani : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत. ( heavy rains in Maharashtra) शेळ्याही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. सोमवारी गंगाखेड पालम आणि सोनपेठ तालुक्यातील काही भागात पाऊस झाला होता. आज तोच पाऊस संपूर्ण जिल्ह्यात सक्रिय झाला आहे. कालपासून सूर्यदर्शन झाले नसून आज पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाण्याचे लोट पसरलेत. हळद ऊस सोयाबीन भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस चांगला मानला जात असला तरी मुग आणि उडीदासाठी मात्र हा पाऊस हानिकारक मानला जात आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली असून एलदरी दुधना आणि सिद्धेश्वर प्रकल्पात पाण्याची वाढ झाली आहे.



या जिल्ह्यात मुसळधार पावसासह ढगफुटी 


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून ढगफुटी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला असून यामुळे चाळीसगाव शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत.



मध्यरात्रीपासून उगमस्थळांवर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे चाळीसगाव शहराच्या मध्यावरून गेलेल्या तितूर नदीचे पाणी परिसरात शिरले. रात्री उशीरापासून पुराचे पाणी आल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. आज सकाळी सुध्दा पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. तसेच बाजारपेठेतही पाणी शिरल्याची माहिती आहे.दरम्यान, तितूर आणि डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तर गिरणा काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 



 मुसळधार पावसामुळेच कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून यामुळे रात्रीपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. आता देखील पाऊस सुरू असल्याने रस्ता दुरूस्त करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे या मार्गावरून जाण्याचे नियोजन करणार्‍यांनी दखल घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.