परभणीत मुसळधार पाऊस, एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला
परभणी जिल्ह्यात एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला आहे.
परभणी : जिल्ह्यात एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला आहे. उपस्थितांनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. सेलू तालुक्यातील कान्हड परिसरातील ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. अशा परिस्थितीत एक जण दुचाकीवरून पूल पार करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पाण्याच्या वेगामुळे हा दुचाकीस्वार बाईकसह पुरात वाहून गेला.
परभणी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागलेत आहेत. परभणी शहराबाहेरून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्यास पूर आलाय, दरम्यान खटिंग सायाळा गावाजवळ याच नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतांना एक दुचाकीस्वार पुलावरून पलीकडे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत इतर ही काही तरुण होते. ते ही दुचाकी वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्नशील होते,पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो तरुण दुचाकीसह पाण्यात वाहून गेला.
दरम्यान, तो पोहोत नदीकिनारी आला. त्यामुळे तो वाचला. मात्र, त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. अशीच एक घटना सेलू तालुक्यातील कान्हड परिसरात असलेल्या ओढ्याच्या पुलावर सुद्धा घडली. त्याठिकाणी स्थानिक तरुणांनी त्याला वाहून जातांना वाचवले. पिंगळगड नाल्यातून वाहून जाणाऱ्या या तरुणाला मात्र येथील उपस्थितांना शक्य झाले नाही. पुराच्या पाण्यात दुचाकी वाहून गेली.