सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला पूर आला आहे. दरम्यान, धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी या पावसाचा फटका शेतीला बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील कोकरुड-रेठारे पुल, आणि मेणी ओढ्यावरील येळापूर-समतानगर पुल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  



पावसामुळे कोकरुड, बिळाशी, शेडगेवाडी,येळापुर, मेणी,गुढे- पाचगणी सह परिसरात पाऊस सुरु असल्याने सर्व ओढे भरुन वाहत आहेत. तर खरीपाची पेरणी केलेली भात शेती पाण्याने भरली आहे. यासाठी शेतातील पाणी काढण्या साठी शेतकऱ्यांची  दिवसभर धावपळ सुरु आहे. भात, भुईमूग, मका, आदी पिकांना हा पाऊस फार उपयोगी आहे.