मुंबई / रायगड / नवी मुबंई / कोल्हापूर : राज्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. यापावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिसाला मिळाला. रायगड, पुणे, कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.


नवी मुंबई, रायगडात पाऊस



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईत दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. जोरदार वाऱ्यासह अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नवी मुंबईत विजांच्या कडकडाटात पावसाचे आगमन झाले.  जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला.  बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक जोरदार पाऊस झाला. 



 कोल्हापुरात जोरदार पाऊस झाला.



तर रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असून पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे.


 पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस



पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पुणे आणि कोल्हापुरात दुपारनंतर मुसळधार पाऊस झालाय. पुण्यात अचानक अंधारून आलं आणि तुफान पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे ऑक्टोबर हिटपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.