ठाणे : गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून आज मुसळधार पावसाने ठाणे शहर परिसराला झोडपले. शहरातील स्टेशन परिसरातील नाल्यात तीन जण बुडालेत तर वागळे इस्टेटमध्ये दोघे बुडालेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला. चार जण अद्याप बेपत्ता आहेत.


अर्धे शहर अंधारात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, ठाणे परिसरात जवळपास ५० टक्के भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आलाय. एमएसईबी विभागाकडून वीज बंद करण्यात आलीय. विशेषकरून सखोल भागातील परिसरातील वीज बंद करण्यात आलीय. मुसळधार पावसामध्ये शॉर्टसर्किटसारखे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एमएसईबी विभागानं हा निर्णय घेण्यात आलाय. 


मुंबईप्रमाणंच ठाण्यातह पावसाने कहर केला असून ठाण्यातही ठिकाठिकाणी पावसाचं पाणी तुंबलं आहे. कोपरी, तीन हाथ नाका, चेक नाका, बारा बंगला परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे. तर भास्करनगरमध्ये गाय-म्हशींचा गोठाच पाण्याखाली बुडालाय.  


अतिवृष्टीचा इशारा


गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढ़च्या ४८ तासातही अतिवृष्टीचा इशारा वर्तविण्यात आला आहे. ठाणे शहरातील सखळ भागात पाणी साठले असून, महापालिकेची आत्पकालीन यंत्रणा 24 तास कार्यरत आहे. 


आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांनी टोल फ्री 1800 222 108, दूरध्वनी क्रमांक 25371010, 25399828, 25374578 ते 82, 25399617 आणि 25392323 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकरांना केले आहे.