मुंबई  : आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुळावर माती आल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय. कणकवली स्थानकात बिकानेर एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली आहे. एक तासापासून ही गाडी स्थानकात आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय.


दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात  रात्रभर पाऊस कोसळत होता. आज सकाळपासून ही दमदार पाऊस पड़त असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. सावंतवाड़ी -कारीवडे  येथील एक महिला नदीवर कपडे धुवत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक लोक आणि पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.