लातूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. मात्र, मुख्यमंत्री या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून सुखरुप बाहेर पडतानाचा नवा व्हिडिओ हाती लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निलंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले त्यात ते सुदैवाने बचावले. हेलिकॉप्टर खाली कोसळताच मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी नागरिक आणि पोलिसांनी अपघात झालेल्या हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. 


या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. झी 24 तासच्या हाती हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लागलाय. ज्यात मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या व्हिडिओत मुख्यमंत्री हे चालत दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरपासून सुरक्षित स्थळी गेल्याचं स्पष्ट दिसतंय. 


पाहा मुख्यमंत्री यांचं हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर नेमकं काय झालं आणि मुख्यमंत्री कसे बाहेर पडले ते...